राज साहेबांसोबत काही अनुचित प्रकार घडला तर मनसैनिक शांत बसणार नाही- अविनाश जाधव

blank

टीम महाराष्ट्र देशा :- कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरेंची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये मनसेचे नेते संदिप देशपांडे, अविनाश जाधव, आशिष डोके, रविंद्र सोनार, रवी मोरे यांना पालिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान राज साहेबांसोबत काही अनुचित प्रकार घडला तर मनसैनिक शांत बसणार नाही. त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे. सरकारने महाराष्ट्रात दडपशाही सुरू केली आहे, असं म्हणत अविनाश जाधव यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

कोहिनूर सीटीएनएलमध्ये आयएल अॅण्ड एफएस ग्रुपच्या कर्ज आणि 860 कोटींच्या गुंतवणुकीचा ईडी तपास करत आहे. याच प्रकरणी राज ठाकरेंची चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेरही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोहिनूरप्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची पुत्र उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकरांची दोन दिवसांपासून चौकशी केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या