fbpx

गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट वाड्रांची पुन्हा एकदा ईडीकडून होणार चौकशी

टीम महाराष्ट्र देशा :  मनी लॉड्रिंगप्रकरणी प्रकरणात आरोपी असलेले प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची अंमलबजावणी संचलनालयाकडून(ईडी) पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे. या सुनावणी बाबतची नोटीसही रॉबर्ट वाड्रा यांना धाडण्यात आली आहे.

याआधी देखील रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. पण आता पुन्हा एकदा रॉबर्ट वाड्रा यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. दुबईच्या जुमेराह आणि लंडनच्या ब्रायनस्टोन स्क्वेअरच्या लंडन प्रकरणात बेनामी मालमत्तेच्या संबंधात निवडणुकीपूर्वी रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. वाड्रा यांची आता पुन्हा याच प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. याबाबत वाड्रा यांना नोटीस देण्यात आली आहे. लंडनमध्ये वढेरा यांची १.९ लक्ष पौंडांची मालमत्ता असल्याचा संशय आहे.

दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनिलॉंड्रिंग प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांना मिळालेला जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने ईडीच्या पक्षात निर्णय दिला होता. रॉबर्ट वाड्रा व त्यांचे सहकारी मनोच अरोरा यांना नोटीस पाठवली होती. ही नोटीस अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवरून पाठवण्यात आली होती.