पक्षांतर केलेल्यांचीही ‘ईडी’ चौकशी होऊ शकते : चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्ष बदलाचे वारे जोरात वाढत आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते सत्ताधारी भाजप व शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसत आहे. विरोधक मात्र ईडी आणि सीबीआयच्या चौकशीत सुट मिळावी म्हणून नेते पक्षांतर करत असल्याचा आरोप करत आहेत.

या सर्व प्रकरणावरून भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. पाटील यांनी ‘ भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचीही चौकशी होऊ शकते अस विधान केले. तसेच ईडी स्वायत्त संस्था आहे. त्यांच्याकडून दोन ते तीन वर्षे रेकी केल्यानंतरच चौकशी केली जाते. भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांनाही चौकशीला सामोर जावं लागु शकतं असं विधान केले आहे.

दरम्यान, कोहिनूर मिल गैरव्यवहार प्रकरणी मनसे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने चौकशी केली. परंतु या चौकशीतून काय समोर आले हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. राज ठाकरे यांची ही चौकशी तब्बल ९ तास सुरु होती.

राज ठाकरे यांच्या चौकशीला विरोधकांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला जबाबदार धरले आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी भाजपला लक्ष केले होते. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळेचं त्यांना चौकशीला सामोर जावे लागल्याचा आरोप आहे.