फेरीवाल्यांकडून पुन्हा मनसे ‘टार्गेट’ ; विक्रोळीत मनसे कार्यकर्त्याला जबर मारहाण

मुंबई: फेरीवाले आणि मनसे यांच्यातील संघर्षाला आता हिंसक वळण मिळत आहे. एकीकडे मनसे कार्यकर्ते अनधिकृत फेरीवाल्यांना खळ्ळखट्याकच्या भाषेत हकलावत आहेत तर फेरीवाले सुधा मनसेला त्यांच्याच भाषेत उत्तर देत आहेत.

मालाड मधील मनसेचे विभागप्रमुख सुशांत माळवदे यांचे मारहाण प्रकरण ताजे असताना आता विक्रोळीतील मनसेचे उपविभाग प्रमुख विश्वजित ढोलम यांना फेरीवाल्यांकडून जबर मारहाण झाली आहे. त्यांच्यावर महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना निवेदन देत असताना ही मारहाण झाल्याचा दावा विश्वजित ढोलम यांनी केला आहे.

दरम्यान, विक्रोळीत मनसे कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरणात काँग्रेस कार्यकर्ता अब्दुल अन्सारीसह एकावर गुन्हा झाला असून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.Loading…
Loading...