विमान वाहतूक घोटाळाः ईडीकडून प्रफुल्ल पटेलांना दुसऱ्यांदा समन्स

टीम महाराष्ट्र देशा- हवाई वाहतूक करारातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. येत्या १० किंवा ११ जून रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी त्यांना ६ जून रोजी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. परंतु, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण चौकशीस हजर राहू शकत नसल्याचे सांगत पटेल हे गैरहजर राहिले होते.

उद्योग सल्लागार दीपक तलवारने यूपीए सरकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावरून विशिष्ट विमान कंपन्यांना झुकते माप देत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग ३ आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या मोबदल्यात त्याला २००८- ०९ दरम्यान २७२ कोटी रुपये मिळाल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला होता. याशिवाय त्याच्यावर ५ गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. सध्या तुरूंगात ईडीने ऑगस्ट २०१७ मध्ये या घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती.

Loading...

याप्रकरणात सीबीआयने नागरी उड्डान मंत्रालयाचे अधिकारी, एनसीआयएल, एअर इंडिया आणि अज्ञात व्यक्तिंविरोधात एफआयआर दाखल केला. चाैकशी सुरू होताच दीपक देश सोडून पळाला होता. त्यानंतर दुबईतून प्रत्यार्पण करत ईडीने त्याला अटक केली.ईडीने दीपकला अटक केली असून सध्या तो तुरूंगात आहे.दीपक माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र असल्याने या हवाई वाहतूक उद्योग करारातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी पटेल यांचीही चौकशी करण्यात येणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली