राष्ट्रवादीच्या आमदाराला ईडीकडून अटक, सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी कारवाई

ncp

मुंबई : शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आधी हे चौघे पुणे पोलिसांच्या कस्टडीमध्ये होते. ईडीने PMLA कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई केली आहे.

बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच अनिल भोसले यांना तुरुंगात पाठवले आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असून ते दुसऱ्यांदा पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विधानपरिषदेत नेतृत्व करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणात भोसले याना गेल्या वर्षी 25 फेब्रुवारी 2020 रोजी पुण्यातील शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यासंबंधी पोलिसांनी अटक केली होती. आमदार अनिल भोसले हे शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन आणि संचालक होते.

ईडीच्या पथकाने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर १६ जानेवारी रोजी छापे टाकले होते. बँकेशी संबंधित असलेल्या पुणे आणि लगतच्या विविध भागांमध्ये कारवाई करत महत्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले होते.

बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच आर्थिक गुन्हे शाखेकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. रिझर्व बँकेच्या 2018 ते 2019 सालातील आर्थिक व्यवहारांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. यात जवळपास 72 कोटी रुपयांची अनियमितता आढळली होती.

यानंतर संचालक मंडळ बरखास्त करून फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली होती. यामध्ये माजी आमदार व बँकेचे संचालक शिवाजीराव भोसले, सूर्याजी पांडुरंग जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दत्तू पडवळ यांच्यासह काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या :