नीरव मोदीच्या सुनावणीसाठी ईडी आणि सीबीआयचे पथक लंडनमध्ये दाखल

टीम महाराष्ट्र देशा : हजारो कोटी रुपयांचा गफला करून पलायन करणाऱ्या हिरे-व्यापारी नीरव मोदी याला हॉलबॉर्नमध्ये अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर आज निरव मोदी याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी भारतातून अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआय यांचे संयुक्त पथक वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर झाले आहे. निरव मोदीच्या जामीन अर्जावर लंडनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे.

दरम्यान नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटी रुपयांचा गंडा घालून पळ काढला होता. मात्र १९ मार्च रोजी लंडनच्या हॉलबॉर्नमध्ये नीरव मोदीला अटक करून मेट्रोपॉलिटन पोलिसांनी त्याला वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी कोर्टाने त्याला जामीन नाकारून त्याची रवानगी २९ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

1 Comment

Click here to post a comment