प्रोव्हिजनल अडमिशन च्या नावाखाली विद्यार्थांची आर्थिक लुट

पुणे : सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या विधी महाविद्यालयात विद्यार्थांची आर्थिक लुट होण्याचा प्रकार समोर आला आहे. त्या विरोधात शहरातील विद्यार्थी संघटनानी आक्रमक पवित्रा घेतला असून विद्यार्थांची आर्थिक लुट थांबवावी अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

विधी शाखेत प्रोव्हिजनल अडमिशन च्या नावाखाली विद्यार्थांकडून ३००० रुपये किंवा वार्षिक फी च्या ५०% फी आकरण्यात येते. विद्यार्थाने अडमिशन रद्द केल्यास महाविद्यालाकडून कोणतीही फी परत करण्यात येत नाही. विशेष म्हणजे विद्यापीठाचे फी आकारणी संदर्भात कोणतेही परिपत्रक नाही. त्यामुळे विधी महाविद्यालाकडून मनसोक्त फी आकरण्यात येते. विधी महाविद्यालयात होणारी आर्थीक लुट त्वरित थांबवावी आणि प्रोव्हिजनल फी हि वार्षिक फीच्या १०% करावी. अशे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठातील विधी शाखेचे अधिष्ठांना दिले आहे. या संदर्भात विद्यापीठातील अधिष्ठ विजय खरे म्हणाले, काल सुट्टी असल्यामुळे काही निर्णय घेण्यात आला नाही. शहरातील विधी महाविद्यालयात संपर्क साधून योग्य तो निर्णय घेऊ.

अभाविप गणेशखिंड प्रमुख आणि विधी शाखेचा विद्यार्थी योगेश्वर पुरोहित यांचाशी सवांद साधला असता ते म्हणाले, विध्येच्या माहेर घरात विधि महाविद्यालयात  प्रोव्हिजनल अडमिशन साठी महाविद्यालयांकडून वाटेल तशी फी आकारण्यात येते आणि ज्या वेळेस विद्यार्थी अडमिशन रद्द करतो किंवा अडमिशन घेत नाही त्यावेळेस रक्कम महाविद्यालय परत देत नाही. गरीब घरातील विद्यार्थी संघर्ष करून शिक्षण घेत असतो. त्याला या प्रकाराचा खुप मोठा आर्थिक फटका बसत आहे. विद्यापीठाचे या संदर्भात कोणतेही परिपत्रक नसल्याने विधि महाविद्यालय याचा पुरेपुर फायदा घेऊन विद्यार्थ्यांना लूटत आहेत. या शिक्षणाच्या बाजारिकरणाविरोधात विद्यापीठाने लवकरात लवकर करवाई करावी व परिपत्रक काढावे अन्यथा अभाविप या विषयात गांभीर्याने दखल घेईल.