शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक; डिग्रस येथील शेतकऱ्याची कृषी मंत्र्यांकडे तक्रार!

farmer

औरंगाबाद : कृषी सेवकाकडून शेततळी तसेच पन्नी बसविण्यासाठी मिळणारा मोबदला मिळवून देण्यासाठी शेतक-यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत असुन सिल्लोड तालुक्यातील डिग्रस येथील शेतकरी आनंदा सखाराम अंभोरे यांनी थेट कृषी मंञी दादा भुसे यांच्याकडे कृषी सेवकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

सिल्लोड तालुक्यातील डिग्रस गावातील शेतकरी – शेतमजुर – गोरगरिबांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासनाकडून कृषी विभागांतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. तरी या योजने अंतर्गत शेतकरी- शेतमजुर, गोरगरिबांना योजनांचा लाभ मिळावा हा हेतू न जोपासता येथील कृषी सेवक अनिल सोनवणे हा कर्मचारी शेतकरी, शेतमजुर, गोरगरिबांना मिळणा-या विविध शासकीय लाभापासुन वंचितच ठेवत आहे. कृषी विभागाच्या अंतर्गत डिग्रस येथील आनंदा सखाराम अंभोरे यांच्या गट नंबर ११३ मध्ये शेततळे तसेच पन्नी बसविली.

खाजगी सावकारांकडून कर्ज काढून सदरील शेततळे सह पन्नी बसविली. अनेक दिवसांपासून अनुदानाबाबत कृषी सेवक अनिल सोनवणे यांच्याकडे विचारणा केली असता अधिका-यांना पैसे द्यावे लागतात. असे सांगून तीस-चाळीस हजार रुपये द्यावे लागतील. असा वेळोवेळी तगादा लावला. कृषी सेवक अनिल सोनवणे यांना पैसे दिले नसल्याने अद्यापही अनुदानाची रक्कम मला मिळण्यात अडचणी येत आहे. कृषी सेवक अनिल सोनवणे यांची चौकशी करुन कार्यवाही करावी. तसेच माझ्या शेततळी-पन्नी कामांचे तात्काळ अनुदान मिळवून द्यावे असी मागणी सिल्लोड तालुक्यातील डिग्रस येथील शेतकरी आनंदा सखाराम अंभोरे यांनी थेट कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या