असे करा पर्यावरण पूरक गणपती विसर्जन

ganesh६६६

वेब टीम : मोठ्या थाटामाटात १२ दिवसांपूर्वी गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात  आले. उद्या याच पाहुण्याला निरोप देण्यासाठी शहरातील नदी घाटावर अनेक भाविक गर्दी करतील व मोठ्या प्रमाणात नदी,नाले,ओढे, या मध्ये विसर्जन केले जाते. यामुळे नदी नाले व पर्यावरणाची  मोठ्याप्रमाणात हानी होते.पण जर घरच्या घरी पर्यावरण पूरक पद्धतीने गणपती बाप्पाचे विसर्जन केले तर पर्यावरणाची मोठ्याप्रमाणात हानी टाळता येईल.

असे करा घरच्या घरी गणपती विसर्जन

एका मोठ्या बादलीत पाणी घेऊन त्या मध्ये अमोनियम बाय कार्बोनेट मिक्स करावे .गणेशमूर्तीचा आकार लक्षात घेऊन त्या प्रमाणात बादलीत अथवा कुंडात अमोनियम बायो कार्बोनेट टाकल्यास मूर्तीचे काही तासांमध्ये विघटन होते.

मूर्तीच्या आकारानुसार अमोनियम बायो कार्बोनेट व पाण्याचे प्रमाण खालील प्रमाणे

मूर्तीचा आकार   बादलीची व्याप्ती  पाण्याचे प्रमाण  अमोनियम बाय कार्बोनेट

६ इंच               १० लिटर         ८ लिटर                १ किलो

७ ते १० इंच       १५ लिटर        १० ते १२ लिटर       २ किलो

११ ते १४ इंच     २५ लिटर        २० ते २२ लिटर       ४ किलो

१५ ते १८ इंच     ५० लिटर        ४० ते ४५ लिटर       ६ किलो

२ ते ३ दिवसांत मूर्तीचे विघटन होते.विघटन झाल्यानंतर ते पाणी झाडांना टाकू शकता. अशाप्रकारे पर्यावरण पूरक गणपती विसर्जन करू शकतात.

कुठे मिळेल अमोनियम बाय कार्बोनेट?

महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात किवां विसर्जन घाटाजवळील महापालिकेच्या कोटी मध्ये मोफत वाटप करण्यात येत आहे.