fbpx

दिवसभरात भाजपला दुसरा मोठा धक्का, ‘पीएम नरेंद्र मोदी’ला निवडणूक आयोगाचा ब्रेक

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदान उद्या होणार आहे, मात्र मतदानाच्या एक दिवस आगोदर भाजपला दोन मोठे धक्के बसले आहेत, राफेल प्रकरणी फेरसुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्यानंतर, आता बहुचर्चित पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाने ब्रेक लावला आहे. त्यामुळे उद्या ११ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती, चित्रपट प्रदर्शित करून नागरिकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, यापूर्वी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. तसेच निवडणूक आयोगाने काय तो निर्णय घ्यावा, असे सांगितले होते.

दरम्यान, आज निवडणूक आयोगाने चित्रपट प्रदर्शित झाल्यास सर्व पक्षांना समान संधी मिळणार नाही. मोदींच्या बायोपिकमुळे निवडणुकीत भाजपाला झुकतं माप मिळू शकतं, असं निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक होईपर्यंत चित्रपटावर स्थगिती दिली आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉयने नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली आहे. यामध्ये मोदींचे बालपण ते आतापर्यंतचा काळ दाखवण्यात आला आहे.