शिवस्मारकाच्या कामाचा पत्ता नाही मात्र स्मारक अध्यक्ष मेटेंसाठी 20 लाखांची अलिशान कार

shivsmarak and vinayak mete

 

टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे जलपूजन होवून दीड वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. अशातच आता शिवस्मारकाच्या कामाचा पत्ता नसताना स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटेंसाठी 20 लाखांची अलिशान कार घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नव्या गाडीची खरेदी केली जाणार आहे.

राज्याच्या तिजोरीत खडकडाट असल्याच कारण देत सरकारकडून काटकसर सुरु आहे. त्यामुळे महागडी कार घेण्यास सुधीर मुनगंटीवारांच्या अर्थ विभागाकडून विरोध केल्याची माहिती मिळत आहे. तर हा विरोध डावलून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी देण्यासाठी दबाव टाकल्याच बोलल जात आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर कधीकाळी आक्रमक असणारे विनायक मेटे हे मागील काही काळापासून भाजपवर नाराज असल्याच दिसत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर थेट दिल्लीत परिषद घेण्याचा इशारा मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाकडून देण्यात आला आहे. त्यामुळेच नाराज मेटेंना खुश करण्यासाठी हि कार खरेदी केली जात असल्याच दिसत आहे.