Share

Cloves | हिवाळ्यात रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

टीम महाराष्ट्र देशा: लवंग (Cloves) हा एक फक्त मसाला पदार्थ नाही, तर एक आयुर्वेदिक औषधी देखील आहे. साधारणपणे लवंगाचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? लवंग आपल्या आरोग्यासाठी (Health) पण खूप फायदेशीर आहे. कारण लवंगांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आयरन, फॉस्फरस, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, मॅगनीज आणि अँटीअँक्सीडेंट गुणधर्म आढळतात. त्यामुळे नियमित लवंगाचे सेवन केल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकतात. लवंग विविध प्रकारे वापरला जाते. काही लोक लवंगाचा चहामध्ये वापर करतात, तर काही लोक जेवणाची चव वाढवण्यासाठी उपयोग करतात. पण सकाळी रिकाम्या पोटी चावून लवंग खाल्ल्याने तुम्हाला अनेक आरोग्याचे फायदे मिळू शकतात. नियमित सकाळी रिकाम्या पोटी दोन लवंग खाल्ल्याने तुम्ही पुढील आजारांपासून दूर राहू शकतात.

दातदुखी

नियमित लवंगाचे सेवन केल्याने दातासंबंधी समस्या नष्ट होऊ शकतात. कारण लवंगामध्ये युजेनॉल नावाचे एक तत्त्व आढळते. हे तत्व दातातील वेदना कमी करण्यास मदत करते. त्यामुळे नियमित सकाळी रिकाम्या पोटी लवंग चघळल्याने तुमच्या दातासंबंधित समस्या दूर होऊ शकतात.

रोगप्रतिकारशक्ती

तुम्हाला जर तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करायची असेल, तर तुम्ही नियमित सकाळी रिकाम्या पोटी लवंग चाघळले पाहिजे. कारण लवंगामध्ये विटामिन डी आणि अँटीअँक्सीडेंट उपलब्ध असतात. हे गुणधर्म शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देतात. त्याचबरोबर विटामिन सी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.

सर्दी आणि खोकला

लवंग हे सर्दी आणि खोकल्यासाठी एक रामबाण उपाय मानले जाते. कारण लवंगांमध्ये अँटिऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म तुम्हाला सर्दी आणि खोकल्यापासून लांब ठेवू शकतात. त्यामुळे सकाळी रिकामा पोटी लवंगाचे सेवन केल्याने तुम्ही सर्दी, खोकला आणि मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: लवंग (Cloves) हा एक फक्त मसाला पदार्थ नाही, तर एक आयुर्वेदिक औषधी देखील आहे. साधारणपणे लवंगाचा वापर …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now