fbpx

सभा खा. मोहिते-पाटलांच्या मतदारसंघात, घोषणा मात्र प्रभाकर देशमुख आगे बढोच्या

अकलूज: राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून निर्धार परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज या दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण येथे सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मतदारसंघ खा .पाटलांचा असला तरी घोषणा मात्र प्रभाकर देशमुख आज बढोच्या ऐकायला मिळाल्या.

माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. मतदारसंघाच्या निर्मितीनंतर 2004 मध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार हे येथुन विजयी झाले तर 2009 मध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे विजयी झाले होते. दरम्यान आता आगामी निवडणुकीसाठी या मतदारसंघात दोन प्रमुख चेहरे समोर आले असून खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या मध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे.

विजयसिंह मोहिते पाटील आणि प्रभाकर देशमुख यांनी आज मतदारसंघामध्ये होत असलेल्या परिवर्तन यात्रेवेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. याचे चित्र फलटणमधील सभेवेळी पाहायला मिळाले. फलटणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेवेळी पक्षाचे सर्व प्रमुख नेते स्टेजवर उपस्थित होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष ने धनंजय मुंडे बोलण्यासाठी उठले असता काही कार्यकर्त्यांनी प्रभाकर देशमुख आज बढोची घोषणाबाजी केली.