मनपाच्या दिवाळी प्रदर्शनाला खा. कराड, जलील, आ. सावे यांची ‘विशेष भेट’; स्टॉल्सला भेट देऊन दिल्या शुभेच्छा!

मनपाच्या दिवाळी प्रदर्शनाला खा. कराड, जलील, आ. सावे यांची ‘विशेष भेट’; स्टॉल्सला भेट देऊन दिल्या शुभेच्छा!

bhagwat karad, imtiyaz jaleel

औरंगाबाद : दिवाळीनिमित्त महिला बचत गटाच्या उत्पादीत वस्तूला बाजारपेठ उपलब्ध करून त्यांचा आर्थिक फायदा व्हावा यासाठी महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभाग व दिनदयाळ उपाध्याय अभियानांतर्गत आयोजित महिला बचत गटाच्या उत्पादित वस्तू प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाले. तर रविवारी (दि.२४) केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी या महिला बचत गटाच्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन प्रदर्शनाची प्रशंषा करून शुभेच्छा दिल्या.

औरंगाबाद कलाग्राम येथे महानगरपालिकेच्या वतीने २३ ते २५ ऑक्टोंबर दरम्यान तीन दिवसीय महिला बचत गट उत्पादित वस्तू प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी कलाग्राम येथे महानगरपालिकेच्या वतीने भरवण्यात आलेल्या या महिला बचत गट वस्तू प्रदर्शन व विक्री प्रदर्शनाची पाहणी करून प्रत्येक स्टॉलला भेट देऊन विक्रीला ठेवण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थाची, कपड्यांची, दिवाळीच्या साहित्याची पाहणी करून प्रदर्शनाची प्रशंषा केली व त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल महानगरपालिका प्रशासनाचे कौतुक केले. महिला बचत गटाचे अशा प्रकारचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करून या मेळाव्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले पाहिजे. मेळाव्याला लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग व प्रतिसाद वाढला पाहिजे असेही डॉ.कराड यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर बापू घडामोडे, मनपाच्या महिला व बालकल्याण माजी सभापती माधुरी अदवंत आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनाला खा. इम्तियाझ जलील, आ. अतुल सावे, यांनीही भेट देऊन प्रत्येक स्टॉलची पाहणी केली. या प्रदर्शनात एकूण १०६ महिला बचत गट सहभागी झाले आहेत. प्रदर्शनात खाद्यपदार्थांची रेलचेल असून दिवाळीसाठी लागणाऱ्या पूजेच्या साहित्यापासून ते खाद्यपदार्थ पर्यंत विविध घरगुती उत्पादित वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या