बीफ खा, कीस करा! पण – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

मुंबई : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे मुंबईतील ‘आर.ए.पोद्दार ऑफ कॉलेज अॅण्ड इकॉनॉमिक्स’च्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, बीफ खायचे असेल तर खा, किस करायचे असेल तर किस करा तो सर्वांच वैयक्तिक प्रश्न आहे. त्यासाठी फेस्टिव्हल कसले करता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

भाजप चे सरकार असलेल्या राज्यांमध्ये गौवंश बंदी करण्यात आली. तसेच कत्तलीसाठी जनावरांची खरेदी-विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याला विरोध म्हणून म्हणून काही महाविद्यालयांमध्ये बीफ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावर व्यंकय्या नायडू म्हणाले, मी स्वत: मांसाहारी आहे. कुणी काय खावे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. काही जण प्रत्येक मुद्याला राजकीय रंग देण्याच्या नादात काहीही बोलतात. असा टोला हि त्यांनी लगावला.

जेएनयु विद्यापीठात अफजल गुरु च्या समर्थनात घोषणा दिल्या होत्या. त्या संदर्भात बोलताना नायडू म्हणाले,काही लोक अफजल गुरुचा जप करतात. त्याने देशाची संसद उडवून देण्याचा कट रचला होता हे विसरु नका.