fbpx

खा.छत्रपती उदयनराजे व आमदार शिवेंद्रराजे यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

udayanraje bhosale and shivendra raje bhosle

सातारा: खासदार छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये गेल्या वर्षी सुरूचि बंगल्यावर राडा झाला होता. सदर प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून छत्रपती उदयनराजे यांनी अर्ज दाखल केला असून बुधवारी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही काही दिवसांपूर्वी जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांना तात्पुरता जामीन मंजूर झाला होता. यानंतर शनिवारी दुपारी छत्रपती उदयनराजे यांच्यावतीने शनिवारी अॅड. ताहीर मणेर यांनी अर्ज दाखल केला. या दोन्ही नेत्यांच्या जामीन अर्जावर एकाच दिवशी सुनावणी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

काय होते प्रकरण ?

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे यांच्या समर्थकांमध्ये आनेवाडी टोल व्यवस्थापनावरून सुरूचि बंगल्यावर चांगलीच जुंपली होती. अनेक प्रमाणात गाड्यांची तोडफोड सुद्धा करण्यात आली होती. पोलिसांनी दोन्ही बाजूंकडील सुमारे १५० हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत.