अन् अतिवृष्टीने झालेले नुकसान पाहून खा. नवनीत राणांना अश्रू अनावर, पाहा हा व्हिडिओ..

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह अमरावती जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळला. अतिवृष्टीमुळं पूरस्थिती निर्माण झाली. शेतीचंही नुकसान झालं. अनेक घरांची पडझड झाली. लोकसभेचं कामकाज आटोपून खासदार नवनीत राणा या थेट अमरावतीत पोहोचल्या. त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

अमरावतीतील पूरस्थिती, घरांची पडझड, शेतीचं नुकसान हे सगळं पाहून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनाही अश्रू अनावर झाले. पाऊस सुरू असताना त्यांनी खार तळेगाव, टाकरखेडा, रामा साहुर, शिराळा येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची चिखलात जाऊन पाहणी केली. यावेळी नवनीत राणा यांनी चिखलातुन पुराच्या पाण्यातून वाट काढत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना नागरिकांना धीर दिला. पाहा हा व्हिडिओ..

जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. नदीनाल्यातील पाणीपातळी वाढली असून, मेळघाटातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत बुधवारपासून पावसाने जोर धरला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. यामध्ये सोयाबीन, तूर, कपाशी पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.

अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक पूल खचले असून अनेका गावांचा संपर्क तुटला. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे नवनीत राणा यांनी प्रशासनाला निर्देश दिले.

महत्त्वाच्या बातम्या