Video: मेक्सिकोच्या किनारपट्टीवर 8.1 रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामी येण्याची भीती

मेक्सिकोमध्ये 8.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून हा मेक्सिकोमधील गेल्या 32 वर्षातला सर्वात जास्त तीव्रतेचा भूकंप आहे. हा भूकंप समुद्र किनारपट्टी लगत झाला आहे त्यामुळे त्सुनामी येण्याची भीती वर्तवली जात आहे.

दरम्यान या भुकंपामुळे आता प्रयत्न पाच लोकांचा मृत्यू झाल्याच वृत्त ‘बीबीसी’कडून देण्यात आले आहे. भूकंप झाल्यावर मेक्सिकोत अनेक लोकं रस्त्यावर धावून आले. काहींनी इतक्या तीव्रतेचा भूकंप कधीच अनुभवलं नसल्याचं सांगितल आहे.

भूकंपाची सुरुवात मेक्सिकोपासून 123 कि.मी. दुर पीजिआपान इथं झाली होती.मेक्सिकोच्या हवामान खात्याच्या माहितीनुसार या भूकंपामुळे त्सुनामी येण्याचा धोका वाढला आहे.