पाऊस थांबला, पुण्यात उत्साहात मतदान सुरु 

blank

पुणे : पुणे शहरात उत्साहानं मतदानाला सुरुवात झाली आहे. काल रात्रीपर्यंत सुरू असलेला पाऊस सकाळी थांबल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. रविवारी दिवसभर पाऊस पडत होता. सोमवारीही पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता मात्र सकाळच्या सत्रात पाऊस थांबल्याने नागरिक मतदानासाठी बाहेर येत आहेत.

शिवाजी नगर मॉडेल कॉलनी भागातील विद्या भवन हायस्कूल आणि पत्रकार नगर मधील विखे पाटील हायस्कूल इथं सखी मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे. तसंच मतदान केंद्रांवर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये संथ गतीने मतदान होत आहे.

सातारा पावसाची उघडीप असल्याने सकाळ पासुन मतदान केंद्रांवर गर्दी दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासून मतदानाला शांततेने प्रारंभ झाला आहे. सध्या पावसाची उघडीप असली तरी सकाळपासून ढगाळ पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे मतदान संथ गतीने होत आहे. नाशिकमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं उघडीप दिल्यानं मतदारांना दिलासा मिळाला आहे. मात्र ढगाळ हवामान कायम आहे.

blank

सांगली जिल्यातील आठ विधानसभा मतदारसंघा साठी मतदान होत असून, जिल्ह्यात मतदानाला ग्रामिण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मतदान केंद्रा बाहेर मतदारांच्या मोठ्याच्या मोठ्या रांगा आहेत. दरम्यान इस्लामपूर येथील साखराळे गावातील 63 क्रमांकाचा मतदान केंद्रातील मतदान यंत्र बिघाड झाल्याने 45 मिनिटे मतदान थांबले होते. मतदान यंत्र दुरुस्त केल्यावर 45 मिनिटांनी मतदान सुरू झाले.

महत्वाच्या बातम्या