आरोग्य मंत्रा : वाताची लक्षणे आणि काळजी

 टीम महाराष्ट्र देशा : आयुर्वेदात वर्णन केलेल्या तीन दोषांपैकी एक दोष म्हणजे वात, इतर दोष म्हणजे कफ आणि पित्त. जो दोष प्रकर्षाने असतो त्यावरून तो वात प्रकृतीचा आहे की अन्य ते ठरते.

Loading...

तिनही दोष निरनिराळ्या ऋतूत या तीन अवस्थांमधून जातात. उदा. वातदोषाचा चय ग्रीष्म ऋतूत, प्रकोप वर्षा ऋतूत आणि प्रशम शरदात होतो. पित्तदोषाचा चय वर्षाऋतूत, प्रकोप शरदात तर शमन हेमंतात होते. कफदोषाचा चय शिशिरात, प्रकोप वसंतात तर प्रशम ग्रीष्मात होतो.’चय एव जयेत् दोषः’ ‘म्हणजे दोष साठत असतानाच योग्य काळजी घेतली तर पुढे त्या दोषाचा प्रकोप होऊ शकत नाही. मात्र हे घडले नाही तर प्रकुपित दोष शरीराबाहेर काढून टाकणे आवश्यक असते, अन्यथा त्यातून अनेकविध रोगांना आमंत्रण मिळू शकते.

आहार आणि पचन शरीराचा सर्व व्यापार व्यवस्थित होण्यासाठी पचन नीट होणे अत्यावश्यक असते. आहाराचे योग्य पचन झाले की त्यातून शरीरातील धातू तयार होतात, हे धातू जोपर्यंत आपल्या नियमित प्रमाणात असतात तोपर्यंत शरीरधारणाचे काम करतात. अन्नाचे पचन झाले की त्यातून मिळणाऱ्या शक्ती्तून शरीरातील रस-रक्ताकदी सर्व धातूंचे पोषण होते. उरलेला मलभाग शरीराबाहेर जाणे अपेक्षित असते. तरी हे शंभर टक्के घडतेच असे नाही. हा साठलेला मलसुद्धा शरीरात रोगाला कारण ठरत असतो, त्यामुळे तो वेळच्या वेळी शरीराबाहेर काढून टाकणे आवश्यठक असते. तसेच, पचन बिघडले व त्यापाठोपाठ धातू अयोग्य स्वरूपात किंवा अति प्रमाणात तयार होऊ लागले तर ते मलरूप समजले जातात.

अशा वेळी पंचकर्माच्या माध्यमातून शरीरशुद्धी करून घेणेच आवश्यशक असते. आहार हा सुद्धा आरोग्य किंवा अनारोग्याला कारणीभूत होऊ शकणारा मुख्य मुद्दा असतो. वात प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींमध्ये खालील लक्षणे आढळून येतात.

वाताची लक्षणे:- 

• अंगकाठीने कृश असते
• तिची त्वचा खरखरीत असते
• केस कोरडे आणि दाट असतात
• झोप कमी आणि सारखी चाळवली जाणारी असते
• वजन कमी व चटकन वाढत नाही
• ग्रहणशक्ती तीव्र पण स्मरणशक्तीत थोड्या काळासाठी असते
• चापल्य भरपूर असून व्यक्ती सतत उत्साही असते
• सहनशीलता आणि एकाग्रता कमी असते
• अस्थिर चित्ताचे असतात

काळजी: 

• वात प्रकृतीच्या माणसाने आंबट, गोड, खारट, पौष्टिक आणि उष्ण पदार्थ खावेत. थंड, कडू, तुरट आणि तिखट पदार्थ टाळावेत किंवा कमी प्रमाणात खावेत..
• चालण्यासारखा हलका व्यायाम करावा.
• गरम कपडे घालावेत, व्यवस्थित विश्रांती घ्यावी आणि जमेल तेव्हा तेल मसाज करावा.
• हिवाळ्यात अधिक काळजी घावी.
• सतत गारठ्याचा संपर्क टाळावा, जागरणे टाळावीत.

पोटातील चरबी कमी करण्यासाठी ५ घरगुती उपाय

हेल्थ टिप्स- रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे

‘ह्या’ भाज्या पावसाळ्यात चुकून सुद्धा खाऊ नका !

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...