अफवांवर विश्वास ठेवू नका; मी भाजपमध्येच राहणार – खडसे

जळगाव: माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची पोस्ट सोशल मिडीयावर फिरत आहे. मात्र, भाजपाचा आपण भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ता असून दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही. सदर बातमी खोटी असून, मी भाजपामध्येच राहणार असल्याच स्पष्टीकरण खुद्द एकनाथ खडसे यांनीच दिले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी हि माहिती दिली आहे.

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे मागील काही महिन्यांपासून भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे ते पक्षाला सोडचिट्ठी देणार असल्याच्या बातम्या देखील अनेकवेळा आल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी जळगाव येथील एका कार्यक्रमात खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा आदराने ‘चरणस्पर्श’ केल्याचा फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला. विशेष म्हणजे कालपासून खडसे हे ‘२१ भाजप आमदारांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार’ असल्याची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, आता खुद्द खडसे यांनीच या सर्व अफवा असल्याच सांगितले आहे.