देशातील प्रत्येक राज्याला स्वतंत्र झेंडा असावा : शशी थरुर

Shashi Tharur

वेबटीम : नुकतीच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी स्वतंत्र झेंड्याची मागणी केली होती. त्यावरून मोठं वादळ देखील निर्माण झालं होतं . या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी या मागणीच समर्थन केले आहे.देशातील सर्वच राज्यांकडे स्वतःचा झेंडा असावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी करत नवा वाद निर्माण केला आहे.

काय म्हणाले शशी थरूर?

देशातील प्रत्येक राज्याला स्वतंत्र झेडा असावा, राज्यासाठी वेगळा झेंडा ही एक चांगली कल्पना असेल. फक्त हा झेंडा फुटीरतावाद्यांचे प्रतिक बनू नये, देशातील सर्वच राज्यांकडे स्वतःचा झेंडा असावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी केली.

बंगळुरु येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. झेंडय़ाबाबत स्पष्ट नियम असावेत. या नियमांमुळे राज्याच्या झेंडय़ांना राष्ट्रीय ध्वजापेक्षा कमी महत्त्व मिळायला हवे. ते राष्ट्रीय ध्वजाचा पर्याय बनू नयेत. तसेच देशातील प्रत्येक राज्याला स्वतंत्र झेंडा असावा, राज्यासाठी झेंडा ही एक कल्पना चांगली असेल, असेही थरुर म्हणाले.