नाणार प्रकल्पाबाबत अद्याप प्रत्यक्ष करार नाही ; मुख्यमंत्र्याचं स्पष्टीकरण

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकारने संबंधित कंपनीशी केलेला करार हा वेस्ट कोस्ट रिफायनरीबाबतचा आहे. नाणार किंवा अन्य रिफायनरीबाबत प्रत्यक्ष करार झालेला नाही’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल आहे. नाणार प्रकल्पाला वाढता राजकीय विरोध पाहता मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिल आहे.

नाणार येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा, असे केंद्र व राज्य सरकारलाही वाटत आहे. मात्र स्थानिकांना विश्वासात घेऊनच तो केला जाईल’, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. ‘चेंबूर येथे रिफायनरी गेली ५० वर्षे आहे, मात्र तेथे प्रदूषणाची समस्या नाही’, अस देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.