प्रजासत्ताक दिनापासून पुणे शहरात धावणार बॅटरीवर चालणा-या वातानुकुलीत इ-बस 

पुणे- येत्या प्रजासत्ताक दिनापासून पुणे शहरात बॅटरीवर चालणा-या 25 वातानुकुलीत इ-बस धावणार आहेत. या बसचे तिकीट दर नेहमीप्रमाणेच असतील. महापौर मुक्ता टिळक यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्थायी समितीने बससाठीचे अनुदान देण्यासाठी 116 कोटी रूपयांची विशेष तरतुद केली आहे.
प्रत्येक बससाठी महापालिका ठेकेदार कंपनीला 50 लाख रूपये अनुदान देणार आहे. त्याशिवाय कंपनीला दररोज 225 किलोमीटरसाठी 40 रूपये 32 पैसे प्रत्येक किलोमीटरला या दराने भाडेही देणार आहे. या बसचे तिकीट दर नेहमीप्रमाणेच असतील.