राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांना हिसका दाखवणाऱ्या ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याला गृहमंत्री पदक

मुंबई: गुन्हे अन्वेषणातील गुणवत्तेसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशभरातील १०१ पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफांना पोलिसी हिसका दाखवणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांचा देखील समावेश आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत चांगलीच राडेबाजी पाहायला मिळाली होती. नगरसेवकांव्यतिरिक्त कोणत्याही नेत्याला महापालिकेत जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता. भाजपने तांत्रिक मुद्दे काढल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीकडे संख्याबळ असूनही, धाकधूक वाढली होती. महापौर निवडणुकीसाठी माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ हे महापालिकेत आले. मात्र यावेळी डीवायएसपी सुरज गुरव यांनी त्यांना महापालिकेत प्रवेश करण्यास मज्जाव केला.

Loading...

गुरव यांनी पालिकेत जाण्यास मज्जाव केल्याने मुश्रीफ यांनी अरेरावी केली होती. यावेळी डीवायएसपी सुरज गुरव यांनी पोलिसी खाकी दाखवत ‘गडचिरोलीला जातो नाहीतर घरला जातो, पण भीती घालायची नाही. साहेब, आम्ही कर्तव्य बजावत आहे. राजकारण करत नाही, वर्दीवर यायचं काम नाही, तुम्ही घरी जा’ म्हणत मुश्रीफांना पालिकेतून बाहेर काढले होते. दरम्यान हा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली