कामगार आयुक्तांच्या खुर्चीला घातला चपलांचा हार

Screenshot (1)rpi g

अमरावती : विविध मागण्यांसाठी आज शेकडो युवकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [ गवई गटा ] च्या नेतृत्वात सह कामगार आयुक्त यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र कामगार आयुक्त  आपल्या कार्यालयात हजर नसल्याने मोर्चेकऱ्यांचा राग अनावर झाला व त्यांनी सह आयुक्तांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून आपला निषेध व्यक्त केल्याने या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरु आहे .

Loading...

अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मध्ये सुरु असलेला रतन इंडिया वीज प्रकल्पामध्ये नियमानुसार ९० टक्के स्थानिक तरुणांना स्थायी स्वरूपाच्या नौकऱ्या देण्यात याव्या, प्रकल्पग्रस्तांना व कामगारांना भरीव वेतनवाढ देण्यात यावी, कंपनीमधील कार्यरत असलेल्या अनधिकृत कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून सदर कंत्राट संस्था किंवा बेरोजगार संघटनांना देण्यात यावे या मागणीकरिता आज शेकडो युवकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [ गवई गटा ] च्या नेतृत्वात सह कामगार आयुक्त यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र सह कामगार आयुक्त आपल्या कार्यालयात हजर नसल्याने मोर्चेकऱ्यांचा राग अनावर झाला व त्यांनी सह आयुक्तांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून आपला निषेध व्यक्त केला. यापुढे जर तक्रारींकडे आयुक्तांनी लक्ष न दिल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आरपीआय तर्फे देण्यात आला.Loading…


Loading…

Loading...