लोकशाहीतील घराणेशाही (भाग तीन) : विखे-पाटील कुटुंबीय

टीम महाराष्ट्र देशा : राजा हा राजाच्या पोटी नव्हे तर मतपेटीतून जन्माला यावा असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटले आहे. परंतु आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत घराणेशाहीने लोकशाहीला सुरुंग लावल्याचं दिसत आहे. देशातील सर्वच पक्ष घराणेशाहीला आमचा विरोध आहे सांगतात परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलट असल्याचं दिसून येत आहे.

भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे परंतु राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी घराणेशाहीचा सर्रास वापर करताना दिसून येत आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्याच घरात टिकून रहावी म्हणून राजकीय मंडळी प्रयत्नशील असतात. आज आपण अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या कुटुंबाविषयी जाणून घेणार आहोत.

माजी मंत्री व सध्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत प्रभावी व जेष्ठ नेते आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य राजकारणातील विविध पदांवर कार्यरत आहेत. त्या सर्व सदस्यांविषयी माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

कै. बाळासाहेब विखे पाटील

बाळासाहेब विखे पाटील हे राधाकृष्ण विखे पाटलांचे वडील व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते होते. ते कॉंग्रेस पक्षाचे ते दीर्घ काळ खासदार होते. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या कोट्यातून ते वाजपेयी मंत्री मंडळात केंद्रीय अर्थ राज्य मंत्री होते, तर अवजड उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे. प्रवरनगर चा साखर कारखाना ,प्रवरा शिक्षण संस्था व प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे दीर्घकाळ अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच त्यांनी अहमदनगर जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील हे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आहेत ते सध्या विरोधीपक्षनेते आहेत. महाराष्ट्राचे कृषि व पणन विभागाचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही भूषविले आहे.तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम पाहिले.

सुजय विखे पाटील

सुजय विखे पाटील हे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहे. नुकताच त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने ते चांगलेच चर्चेत आहे आहेत. ते नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, त्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे.

शालिनी विखे पाटील

शालिनी विखे पाटील या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी आहेत. त्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी यापूर्वीही या पदावर काम केलेलं आहे.

अशाप्रकारे अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणावर राधाकृष्ण विखे पाटील व त्यांच्या कुटुंबाचं वेगवेगळ्या पदांवर वर्चस्व असल्याच दिसून येत आहे.

सर्व नेते आपल्याबाजूने जनतेचा विकास करण्यासाठी काम करत असतात. मात्र, हा विकास होत असताना सामान्य कार्यकर्त्यांनाही न्याय मिळणे गरजेच आहे, त्यामुळे ‘राजा हा राजाच्या पोटी नव्हे, तर मतपेटीतून जन्माला यावा’ असे सांगणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारला अनुसरून आम्ही हे सदर सुरु केले आहे.

अश्याच पद्धतीने तुमच्या भागात असणाऱ्या राजकीय घराणेशाहीची माहिती तुम्ही आम्हाला पाठवू शकता. आमच्या [email protected] या मेल आयडीवर आपण ही माहिती पाठवा. सत्यता पडताळून आम्ही तुमचे नाव गुप्त ठेवून बातमीला प्रसिद्धी देऊ.Loading…
Loading...