‘पांडवाच्या कळपात अर्जुन परत आल्याने निवडणुकीची चुरस संपली’

जालना : ‘नाराज झालेले अर्जुन पांडवांच्या कळपात परत आल्याने जालना लोकसभा निवडणुकीची चुरस संपली आहे. रावसाहेब दानवेंसमोर आता राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचेच आव्हान बाकी राहिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवेंच्या प्रचार सभेत बोलत होते.

‘शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर नाराज झाले होते. त्यामुळे पांडवांचा अर्जुन कौरवाकडे चालला होता, पण शेवटी अर्जुनामध्ये रक्त पाडवांचं होतं आणि पाठीमागे पार्थ स्वरूप उद्धव आहे. उद्धव ठाकरेंनी गीता सांगितल्याबरोबर अर्जुनराव पांडवाच्या कळपात परत आले. त्यामुळे जालन्याची चुरस संपली आहे. आता निवडून येण्याचे आव्हान दानवेंसोर राहिलेले नाही. राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आणण्याचे एकमेव आव्हान असल्याचे’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री अर्जुन खोतकर मंत्री बबनराव लोणीकर, मंत्री बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, संतोष दानवे, संदिपान भुमरे, अतुल सावे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.