नागपूर मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे ५ डबे वाशिंदजवळ रुळावरुन घसरले

मुंबई : नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे ५ वातानुकूलित डबे सकाळी पावणे सातच्या दरम्यान आसनगाव-वाशिंद स्थानकादरम्यान घसरले. यात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे आसनगावच्या दिशेने येणाऱ्या गाड्या टिटवाळ्यापर्यंतच सोडल्या जात असून आसनगावकडून मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक पुढील सुचना मिळेपर्यंत बंद राहणार असल्याचे रेल्वेप्रशासनाकडून सांगण्यात आली आहे.

यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांची व लांबपल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Comments
Loading...