fbpx

‘ठाकरे’ चित्रपटादरम्यान चाखायला मिळणार या पदार्थाची चव

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ठाकरे’चित्रपट येत्या 25 जानेवारी 2019रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता या चित्रपटगृहांमध्ये ठाकरे सिनेमा बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांना शिव वडापावचाही आस्वाद घेता येणार आहे.कार्निव्हल सिनेमाच्या 72 चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थांच्या यादीत शिव वडापावचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून छापण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीत प्रसिद्ध असलेला शिव वडापाव देशभरात पोहोचवण्यासाठी पॅन इंडिया सज्ज झालं आहे.याअगोदर ‘ठाकरे’ चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्यातही शिव वड्यांचा आस्वाद उपस्थितांनी घेतला होता. आता पुन्हा एकदा शिव वड्यांचा आस्वाद प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.‘ठाकरे चित्रपट खासदार संजय राऊत निर्मित असून दिग्दर्शक अभिजित पानसे आहेत.यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी असणार आहे तर मीनाताई ठाकरेंच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता राव या असणार आहेत.