वीज घालवून काही होणार नाही  विरोधाचा सूर्य उगवणारचं :राज ठाकरे 

raj thackrey

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मनसेच्या वतीने आज संताप मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मात्र राज्यातील बहुतांश भागातील विद्युत पुरवठा बंद असल्याने राज ठाकरे यांचे भाषण टीव्ही वर लोकांना पाहता आले नाही . विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या टायमिंग वर मनसैनिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केल जात आहे या पार्श्वभूमीवर वीज घालवून काही होणार नाही  विरोधाचा सूर्य उगवणारच अशी टीका  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर केली आहे

Loading...

आज मुंबईमध्ये मनसेच्या वतीने संताप मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मात्र मोर्चा मध्ये राज ठाकरे याचं भाषण होण्याआधी आधी राज्यात बऱ्याच ठिकाणाची बत्ती गुल असल्याचं समोर आल आहे .एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता . त्यासाठीच मनसेने आज मुंबईत संताप मोर्चाचं आयोजन केलं होत. या मोर्चाचे नेतृत्व राज ठाकरे स्वतः करणार असल्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या मोर्चाकडे लागले होते . मात्र राज ठाकरे यांचे भाषण ज्यावेळी सुरु होते त्यावेळी राज्यातील बहुतांश भागातील विद्युत पुरवठा बंद असल्याच्या तक्रारी येत होत्या  . राज ठाकरे भाषण करत असताना मन सैनिकांनी हि गोष्ट राज ठाकरे यांच्या लक्षात आणून दिली यावर भाष्य करताना वीज घालवून काही होणार नाही  विरोधाचा सूर्य उगवणारच अशी टीका  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर केली आहेLoading…


Loading…

Loading...