लॉकडाउनच्या काळात भारतीयांची सर्वाधिक पसंती ‘या’ पदार्थाला

indian food

नवी दिल्ली : देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. लॉकडाउनमुळे नियंत्रण असलेला करोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढताना दिसून येत आहे. या लॉकडाऊनचा खूप मोठा परिणाम उद्योग, व्यवसाय तसेच शिक्षण क्षेत्रावर पण दिसून आला. दुसरीकडे मात्र यालॉकडाऊनच्या काळात अनेकांनी ऑनलाईन खाण्या पिण्याचे पदार्थ मागवण्याला जास्त पसंती दिली आहे. ‘स्विगी’ने तयार केलेल्या रिपोर्टमध्ये या गोष्टी पुढे आल्या आहेत. ‘स्विगी’ने या काळात सगळ्याच वस्तूंच्या तब्बल 4 कोटी ऑर्डर्स घरपोच दिल्या आहेत.

न्युज १८लोकमतने याबाबत वृत्त दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी सर्वाधिक पसंती बिर्याणीला दिली आहे. लोकांनी 5.5 लाख वेळा आपल्या आवडीच्या रेस्टॉरंट्समधून बिर्याणी ऑर्डर केली होती. तसेच त्यानंतर बटर नानला लोकांनी पसंती दिली. बटर नानच्या 3,35,185वेळा ऑर्डर्स दिल्या गेल्या. तर मसाला दोस्याच्या 3,31,423 वेळा ऑर्डर्स दिल्या गेल्या होत्या.

यामध्ये गोड पदार्थनांचा देखील समावेश आहे. चोको लावा केक (Choco Lava cake) 1,29,000 वेळा ऑर्डर्स दिल्या गेल्याचं पुढे आलंय. तर गोड आणि मधुर गुलाबजामच्या 84,558 वेळा ऑर्डर्स दिल्या गेल्या. बट्टरस्कॉच केक (Butterscotch Mousse cake) 27,317 वेळा ऑर्डर्स दिल्या गेल्या. वाढदिवसाचे केक 1,20,000 वेळा ऑर्डर केले गेले होते. पूर्ण जेवणाचं ताट हे 65,000 वेळा मागवलं गेलं. आणि 3,50,000 वेळा झटपट नुडल्स ऑर्डर्स केले गेलेत. त्यामध्ये सध्या जास्त गरज असणारी वस्तू म्हणजे 73 हजार सॅनिटायझर्सच्या बॉटल्स आणि 47 हजार मास्कचाही समावेश आहे.

सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ झाला लीक

…म्हणून माझ्या डोक्यावरचे केस गेले, उद्धव ठाकरेंचे भन्नाट उत्तर

आरोग्यमंत्री टोपे यांनी केले अहमदनगर जिल्ह्याचे कौतुक; कशामुळे कौतुक केले ते जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा