fbpx

पहा व्हिडीओ : शहिदाच्या अंत्यसंस्कारावेळी आमदाराने केली नातेवाईकासोबत धक्का-बुक्की

टीम महाराष्ट्र देशा – सगळा देश शहिद कुटुंबीयांच्या दुःखात सामील झाला आहे. परंतु, बीजू जनता दलाचे ओडिशामधील बाराबती-कटक इथले आमदार देबाशीष समनतरे यांनी मात्र शहिदाच्या अंत्यसंस्कारावेळी नातेवाईकासोबत धक्काबुक्की केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून आमदारावर टीका होत आहे.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी दुपारी ३:२५ वाजता जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. तब्ब्ल २०० किलो वजनाच्या स्फोटकांनी भरलेली चार चाकी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकावली. यामध्ये ४२ जवान शाहिद झाले.गेल्या दोन दशकातला हा सर्वात मोठा हल्ला होता.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले सीआरपीएफचे जवान मनोज कुमार बेहरा यांच्या अंत्यसंस्कारावेळी हा प्रकार घडला. शहीद बेहरा यांच्यावर त्यांच्या मूळ गावी ओडिशातील रतनपूर इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी समनतरे यांनी बेहरा यांच्या अंत्यदर्शनासाठी तिथे आलेल्या नातेवाईकासोबत धक्का-बुक्की केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये समनतरे हे शहीद बेहरा यांच्या पार्थिवाशेजारी उभ्या असलेल्या त्यांच्या नातेवाईकाला धक्का देताना दिसत आहेत.