कोरोनाच्या संकटकाळात नगरपरिषद आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने गाळे भाडे माफ करण्याची मागणी

corona

मोहोळ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन मुळे राज्यासह जिल्ह्यात जवळपास २ महिने झाले सर्व व्यवहार ठप्प आहेत. परिणामी समाजातील इतर सर्व घटकांसोबत व्यापारी वर्ग देखील मोठ्या प्रमाणत आर्थिक संकटात सापडला आहे. बहुतांश व्यापाऱ्यांची दुकाने ही नगरपरिषद आणि बाजार समितीच्या व्यापारी संकुलात आहेत.

या परिस्थिती मध्ये भाडे माफीचा निर्णय शासनाचा असला तरी नगरपरिषदेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी याबाबत शासन स्तरावर निर्णय होण्यासाठी नियमांच्या अधीन राहून राज्य शासनाकडे ठराव पाठवावेजेणेकरून व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल, अशी मागणी सेनेचे उपतालुका प्रमुख नागेश वनकळसे यांनी केली

नगरपरिषद आणि बाजार समितीमधील व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी २ महिने दुकानं बंद होती त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असल्याने या कालावधीतील भाडे माफ करावे कारण व्यापार ठप्प आहे. नगरसेवक आणि प्रशासन यांनी याबाबत विचार करावा आणि सर्वांनी मिळून पाठपुरावा करावा असे आवाहन नागेश वनकळसे यांनी केली. या बाबत चा पाठपुरावा सर्व पक्षीय नेत्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कडे करून व्यापाऱ्यांना न्याय देण्याचे नागेश वनकळसे यांनी आवाहन केले.

#lockdown : सरकारी कामात अडथळा, भाजीविक्रेते व व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल

मुख्यमंत्री दिसण्यापेक्षा काम दिसणे महत्त्वाचे; विरोधकांना CM ठाकरेंनी दिले रोखठोक प्रत्युत्तर

‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदच आभासी होती’