Ashish Shelar | मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरेंच्या काळात बिल्डर, बार मालकांवर सवलतींची खैरात करण्यात आली, असा निशाणा आशिष शेलार यांनी ट्वीट करत साधला आहे. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन देखील शेलारांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. आज पुन्हा त्यांनी निशाणा साधला आहे.
आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “ठाकरे सरकारने बिल्डर, दारुवाले, बारवाले, हाँटेल मालकांवर सवलतींची खैरात केली होती. तर शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईकरांच्या मालमत्ता करात वाढ होणार नाही याची काळजी घेतली. मुंबईकरांनो, फरक बघा. ते गळे काढणार…मुंबई आमची…मुंबई आमची. मात्र तिजोरी भरणार बिल्डर, कंत्राटदार आणि बारवाल्यांची.”
मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Elections) पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना विरुद्धा भाजप-शिंदे गट असा सामना रंगाला आहे. त्यामुळे भाजप नेते सतत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची 25 वर्षांपासून सत्ता आहे. ही सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
ठाकरे सरकारने बिल्डर,दारुवाले,बारवाले, हाँटेल मालकांवर सवलतींची खैरात केली होती.
तर
शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईकरांच्या मालमत्ता करात वाढ होणार नाही याची काळजी घेतलीमुंबईकर हो,फरक बघा..
ते गळे काढणार..मुंबई आमची..मुंबई आमची
तिजोरी भरणार बिल्डर,कंत्राटदार आणि बारवाल्यांची!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 18, 2022
काल काय म्हणाले होते शेलार –
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर घेतलेल्या भूमिकेमुळे आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला होता. “हिंदुस्तानची ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धवजींनी तरी बोटचेपीची भूमिका घेऊ नये, अशी अपेक्षा होती. पण उद्धवजींनी सत्तेसाठी माती खाल्ली आणि बोटचेपीची भूमिका घेतली. केवळ मी, माझा पक्ष आणि माझ्या पक्षाला सत्ता देणारे सहकारी यासाठी स्वत:च्या वडिलांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धवजी तुम्ही बोटचेपी भूमिका का घेतली?”, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- CAT Trailer | अभिनेता रणदीप हुड्डाच्या ‘कॅट’ वेब सिरीजचा जबरदस्त ट्रेलर रिलीज
- Nawab Malik | तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या, गंभीर गुन्हा दाखल!
- Rahul Gandhi | “राहुल गांधींच्या वक्तव्याचा खरा धोका…”, ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा इशारा
- Oppo Reno 9 Series | ‘या’ दिवशी लाँच होणार Oppo Reno 9 सिरीज
- Nilesh Rane | “ही मस्ती लोक फक्त महाराष्ट्रातच करतात” ; निलेश राणे राहुल गांधींवर संतापले