ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळला

एका बाजूला शिवस्मरकासाठी सरकार हजारो कोटी रुपये खर्च करत असताना स्वराज्याच वैभव समजल्या जाणाऱ्या किल्ल्याच्या देखभालीकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलंय कारण   कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळला आहे. पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे या किल्ल्याची अवकळा झाली असल्याचा दुर्गप्रेमींचा आरोप आहे.
या सर्व प्रकारानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दुर्गाडी किल्ला महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. दस्तुरखुद्द  छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला भेट दिली होती तसेच स्वराज्याचं आरमार म्हणून या किल्ल्याचं एक आगळं महत्त्व आहे.
पुरातत्व विभागाने वेळीच लक्ष दिलं असत तर या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या किल्ल्याचीअशी दुरवस्था झाली नसती अशी भावना दुर्गप्रेमींमध्ये आहे.