fbpx

दुर्ग रक्षकांनी जपले राजगड तोरण्याचे पावित्र्य

किल्ले राजगड स्वराज्याची पहिली राजधानी. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील सुमारे २६ ते २७ वर्षे या गुंजन-मावळ खोऱ्यात राजगडाच्या सानिध्यात घालवली. अशा या पवित्र भूमीमध्ये समाजातील काही लोक नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी या राजगडाच्या पवित्र भूमीमध्ये येतात. याठिकाणी दारू मोठ्या आवाजात गाणी, धिंगाणा घालण्याचे प्रयत्न करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी याठिकाणी येतात. अशा पवित्र भूमीचे रक्षण करण्यासाठी गुंजन-मावळ खोऱ्यातील तरुण मुले एकत्र येऊन यावर नियंत्रन ठेवतात व गडकिल्ल्यांचे महत्व समजावून सांगण्यासाठी ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी संपूर्ण दिवस-रात्र पाली दरवाजा व गुंजवणी दरवाजा याठिकाणी गुंजन-मावळ दुर्ग रक्षक संघ व अभिनव नवनिर्माण प्रतिष्ठान या संघटना पहारा देत असतात. गडावर जाणाऱ्या पर्यटकांची तपासणी करून गडावर सोडले जाते. दारू, सिगारेट व इतर पदार्थ गडावर नेण्यासाठी बंदी करण्याचा प्रयत्न करतात. वेल्हे तालुक्यातील सुमारे ५०-६० मुले या गुंजन-मावळ दुर्ग संघटने अंतर्गत एकत्र असतात. त्यात सचिन धायगावे, मकरंद शिंदे, राहुल वालगुडे, संदीप कुंभार, निलेश धरपाळे, योगेश रेणुसे, मारुती धायगावे, सागर उमाळे, राहुल रेणुसे, गणेश नलावडे, मंगेश सुतार, ओंकार शिळीमकर, किरण अल्हाट, विजय तनपुरे, सोनू वालगुडे, संभाजी धरपाळे, मारुती रेणुसे, विशाल कुंठे हे सर्व जण या मोहिमेत उपस्थित होते. सहकार्यासाठी वेल्हा पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी कोळी व साळुंखे हेही दोन दिवस गडाला पहारा देण्यसाठी उपस्थित होते. तसेच राजगड-तोरणा पवित्र मोहिमेला वेल्हा पोलीस स्टेशनचे पी.आय. शंकर गोपाळ साहेब व लडकत साहेब यांनीही चार ते पाच राउंड मारून पर्यटकांची तपासणी केली.

गुंजन-मावळ दुर्ग रक्षक संघ राजगड-तोरणा पवित्र मोहिमे अंतर्गत करण्यात येणारी कामे
* पाली दरवाजा – गुंजवणी दरवाजा  राजगडावर येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करून जे गडावर दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट, संगीत उपकरणे नेतात त्यांवर बंदी करण्यासाठी पहारा करतात.
* गडावर येणाऱ्या काही पर्यटकांची पाली दरवाजावर भोजनाची व्यवस्था करतात.
* गडावर येणाऱ्या पर्यटकांना गडाचे महत्व पटवून दिले जाते व गडाचा इतिहास सांगितला जातो.