पुण्यात आता डुप्लिकेट ‘शिवशाही’ बसचा गोंधळ 

पुणे : पुण्यात खासगी बसचालकांनी चक्क ‘शिवशाही’ बसची कॉपी केल्याची माहिती समोर आली आहे. एसटी महामंडळाची “शिवशाही’ बस सध्या जोरात सुरु आहे, त्यामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. लोकांची पसंती खाजगी ट्रॅव्हल्स पेक्षा एसटी महामंडळाच्या ‘शिवशाही’ बसला नागरिकांची जास्त पसंती असल्याने व्यवसायिकांनी एक शक्कल लढवली आणि डुप्लिकेट ‘शिवशाही’ बस आणली.

स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाने ताफ्यात शिवनेरी, अश्वमेध आणि हिरकणी सारख्या वातानुकुलित आणि आरामदायी बसेस नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. डुप्लिकेट “शिवशाही चा प्रकार लक्षात येताच एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयाने गंभीर दखल घेतली. अशा व्यवसायिकांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील महामंडळाने दिला आहे.