अवकाळी पावसामुळे जि.प. शाळेवरील पत्रे उडाली

औरंगाबाद : कुंभेफळ येथे रविवारी संध्याकाळी झालेल्या आवकाळी पावसामुळे जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले. हि शाळा १९४९ साली बांधण्यात आली होती. दोन खोली असलेल्या शाळेवरील छताचे पत्रे उडाले. तसेच काही भिंतीला तडे गेले आहे. शाळेच्या नुकसानाची पाहणी अधिकारी वर्गाने करून अहवाल तयार केला आहे.

अवकाळी पावसामुळे वादळी वारा सुटला, त्यात शाळेतील छताचे पत्रे उदके. सुदैवाने शाळेत विद्यार्थी नसल्यामुळे जिवीत हानी झाली नाहीत . परंतु दोन खोल्या पडल्यामुळे शाळेतील संगणक व वाचनालयाच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. वेदशाळा हवामान विभागाच्या वतीने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शाळेचे चांगलेच नुकसान केले.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बद्रिनाथ मुळे, ज्ञानेश्वर माऊली शेळके, वसंतराव घाळ, संतोष शेजवळ, ज्ञानेश्वर गोजे, राजूभाऊ जवणे,सपनाताई डाखुरकर, कैलास ताठे, मुख्याध्यापक हाशम शहा यांनी उडालेल्या पत्रे जमा केली. त्यानंतर रीतसर नुकसानीचा पंचनामा करून त्याचे पत्र जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांना सादर केले.

महत्त्वाच्या बातम्या