औरंगाबादेत घडलेल्या ‘या’ घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली

औरंगाबाद : कोरोना सारख्या जीवघेण्या संसर्गा पासून बचाव करण्यासाठी देशाचे वाहतूक पोलीस सतत प्रयत्नशील असतांना औरंगाबाद मध्ये पोलिसांना मारहाण केल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. औरंगाबाद मधील आणा भाऊ साठे चौकातील हि घटना घडली आहे. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील वाहतूक कमी करण्यासाठी अण्णा भाऊ साठे चौकात आज विशेष नाकाबंदी लावण्यात आली होती. असे असतांना देखील तीन तरुण एका दुचाकीवरून संचारबंदीचे नियम धाब्यावर ठेवून फेरफटका मारायला निघाले होते. त्यांना साठे चौकात अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तेथून पोलिसांना हुलकावणी देत पळ काढला. मात्र धक्कादाय म्हणजे हे तरुण काही वेळाने आपल्या इतर काही मित्रान सोबत परत या ठिकाणी आले व तुम्ही आम्हाला आडवलंच कसाकाय असं म्हणत पोलिसांशी हुज्जत घालू लागले.

पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला कि तुम्ही नियमांचे उल्लंघन केलं आहे, म्हणून तुम्हाला अडवण्यात आले मात्र हे तरुण काही ऐकायला तयार नव्हते. त्यांनी पोलिसांवर ओरडायला सुरुवात केली व इतक्यातच एका तरुणाने पोलिसांची काठी हिसकावत त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. तेथे उपस्थित काही महिला पोलिसांनी त्याला अडवायचा प्रयत्न केला मात्र काही सेकंदात या तरुणाने पोलिसांवर काठीचे अनेक प्रहार केले.

या घटने नंतर हे तरुण घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी या घटनेतील दोघांना अटक केली असून फिरोज फारुख हा यातील मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेमुळे औरंगाबादेत संतापाची लाट पसरली असून हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.