‘या’ कारणामुळे मराठवाड्यातील नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार

टीम महाराष्ट्र देशा :संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक ही एकाच टप्प्यात होणार आहे. २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची लगबग वाढली आहे.

राज्यातील राजकारण जरी तापले असले तरी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील कळंकी गावातील ग्रामस्थांनी गावात मोबाईल रेंज नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी त्यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी गावात बीएसएनल आणि एका खासगी मोबाईल कंपनीचा टॉवर उभारण्यात आला आहे. मात्र दीड वर्ष उलटूनही आणि वेळोवेळी पाठपुरावा करुनही अद्याप ही सेवा सुरु झाली नाही. त्यामुळे गावात मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या आहे. मोबाईल नेटवर्क नसल्याने कळंकी गावातील अनेक ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळेच ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.

एकीकडे पंतप्रधान चंद्रावर पूल ठेवण्याची भाषा करत आहेत. परंतु आधुनिक आणि तंत्रज्ञानाने प्रगत असलेल्या देशात मोबाईलला नेटवर्क नसल्याने जर ग्रामस्थांना मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ येत असेल तर हे दुर्दैव आहे.

महत्वाच्या बातम्या