मुंबई : तब्बू (Tabu) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांची जोडी 90 च्या दशकापासून लोकप्रिय आहे. दोघांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे, हे दोघे एकदम जवळचे खास मित्र आहेत. अजय देवगणसोबत तब्बूने ‘विजयपथ’, ‘हकीकत’, ‘दृश्यम’, ‘गोलमाल अगेन’ आणि ‘दे दे प्यार दे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तब्बूने अजूनही लग्न केलेलं नाही. पण तिचं लग्न अजूनही झालं नाही याला कारणीभूत अजय आहे असं तब्बूचं म्हणणं आहे.
एका मुलाखतीमध्ये तब्बूने म्हटले की, “माझ्या वाढत्या वयामध्ये अजय माझा सगळ्यात जवळच्या मित्रांपैकी एक होता. माझा चुलत भाऊ समीर आर्य याच्या शेजारी अजय राहत होता. समीर-अजय यांच्या मैत्रीमुळे माझी आणि अजयची ओळख झाली. समीर-अजय तेव्हा माझ्या मागे मागे यायचे. माझ्या मागे कोणी मुलगा दिसला तरी त्याला धमकी द्यायचे. आज मी अजयमुळेच एकटी आहे.”
पुढे तब्बू म्हणाली, मी जर कोणावर विश्वास ठेऊ शकते तर तो अजय आहे. सेटवर पण अजय असल्यावरती तिथलं वातावरण खूप भारी असत. आमच्या दोघांमधील नाते खूप वेगळे आहे. तब्बूच्या या बोलण्यावरून त्या दोघांमधील मैत्री खुप घट्ट असल्याचे दिसून येते.
महत्वाच्या बातम्या :