fbpx

भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती : अशोक चव्हाण

Ashok chawan and devendra fadnvis

वेब टीम – भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली असून विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे एकही धोरण राबविले नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हे सरकार घालवावेच लागेल अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
अशोक चव्हाण यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजप सत्तेत आल्यापासून तेरा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्योग व्यापार मोठ्या संकटात सापडला आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून समाजात जातीय तेढ निर्माण केले जात आहे.

केंद्रातले आणि राज्यातले सरकार जनतेच्या भल्यासाठी काम करण्याऐवजी दोन चार उद्योगपतींच्या भल्यासाठी काम करित आहेत. कामगार कायदे बदलून कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम सुरु आहे. देशाला भांडवलदारांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवण्यासाठी भाजपला सत्तेवरून खाली खेचा असे आवाहन काँग्रेस पदाधिका-यांनी कार्यकर्त्यांना केले.