उंदीर घोटाळ्यामुळे सरकारच्या नाकाला झोंबल्या मिरच्या- धनंजय मुंडे

dhananjay vr cm

मुंबई: उंदीर घोटाळ्यामुळे सरकारच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत. मृत व्यक्तीच्या संस्थेला काम कसे दिले ? ३ लाख गोळ्या मंत्रालयात ठेवल्या असतील तर पावलो पावली गोळ्या दिसायला हव्या होत्या. मात्र पारदर्शक कारभार असूनही ना गोळ्या दिसल्या ना मेलेले उंदीर, असे फटकारे धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत सरकारला लगावले.

भाजपचे माजी महसूलमंत्री यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघडीस आणला आहे. धर्मा पाटील यांनी स्वत:कडील नव्हे तर मंत्रालयातीलच उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केल्याचा दावा खडसेंनी केला होता.

नेमकं काय आहे मंत्रालयातील उंदीर घोटाळा प्रकरण ?

मंत्रालयात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारण्याचा कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला देण्यात आला होता. ६ महिन्यांत सर्व उंदरांचं निर्मूलन करण्याचं ठरलं होतं. मात्र ७ दिवसांतच सर्व उंदीर मारले असल्याचं सांगण्यात आलं. दिवसाला ४५ हजार उंदीर मारल्याचे सांगितले. मात्र या उंदरांची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली याची काही माहिती दिली नाही. तसेच त्या कंपनीकडे विष हाताळण्याचा परवानाही नव्हता. हा खूप मोठा घोटाळा आहे याची चौकशी करण्याची मागणी एकनाथ खडसेंनी सभागृहात केली होती.