कास पठाराकडे जाणारा रस्ता खचल्यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण

kas pathar

वेब टीम :पावसाळ्यात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या साताऱ्यातील कास पठाराकडे जाणारा रस्ता सोमवारी खचल्यामुळे पठाराकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.कास पठाराकडे जाणारा यवतेश्वरच्या घाटातील रस्ता अचानकपणे खचला. परिणामी कास पठाराकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

Loading...

लाँग विकेंडमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर कास पठाराला भेट देत आहेत. जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराचा पुष्प हंगाम सध्या ऐन बहरात आहे. या काळात कास पठारावर विविध प्रकारची फुले उगवतात. त्यामुळे या काळात मुंबई, पुण्यासह देशभरातून अनेक पर्यटक कास पठारावर येतात. हा हंगाम काही दिवसांपुरताच मर्यादित असल्याने सध्या येथे प्रचंड गर्दीही होताना दिसत आहे.मात्र, यवतेश्वर घाटाच्या पायथ्याशी आल्यानंतर पर्यटकांना रस्ता खचल्याचे कळले. येथील रस्त्याचा भाग पूर्णपणे दरीत कोसळला आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी घाटाच्या पायथ्याशीच वाहतूक थांबवली आहे.Loading…


Loading…

Loading...