वसतिगृहांच्या कामकाजातील त्रुटी दूर केल्यास अनुदान पुन्हा सुरू करू – दिलीप कांबळे

औरंगाबाद : समाज कल्याण विभागातर्फे चालविण्यात येणा-या वसतिगृहांच्या कामकाजातील त्रुटी दूर केल्या तर अनुदान पुन्हा सुरू केले जाईल, असे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले. अनुदान दिले जाणा-या वसतिगृहाची नियमित तपासणी केली जाते. त्यात चारशे ते साडेचारशे वसतीगृहात त्रुटी आढळल्या आहेत. या वसतिगृह चालकांनी त्रुटी दूर केल्या, तरच त्यांचे अनुदान पुन्हा सुरू करण्यात येईल. अनुदान घेणा-या वसतिगृह चालकांनीकामकाजात पारदर्शकता ठेवावी. त्यामुळे शासनावर अनुदान बंद करण्याची वेळ येणार नाही, असेही मंत्री कांबळे यांनी सांगितले.