वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे अमृता फडणवीसांनी बाप्पाला घातले ‘हे’ साकडे

amruta

मुंबई : साकीनाका येथे घडलेल्या एका घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने पीडित महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेवर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

मुंबईतील साकीनाका, ठाण्यातील उल्हासनगर, पुण्यात झालेल्या बलात्कारांच्या घटना या ताज्या असतानाच अमरावतीमध्ये एका 7 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर आळेफाटा येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. नाशिकमध्ये महिलेची दुचाकी अडवत कारमध्ये नेऊन बलात्कार करण्यात आला. उल्हासनगर मध्येही अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे.

यामुळे व्यथित होऊन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज फेसबुक पोस्ट करून बाप्पाकडे साकडे घातले असल्याचे सांगितले आहे. ‘बाप्पाकडे आज एकच साकडं, महिला अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रत्येकाला हिंमत आणि सुबुद्धी दे. दुराचारी, अत्याचारी, अनाचारी हात थांबणार नसतील, तर ही विकृती ठेचण्यासाठी प्रत्येक नारीला सक्षमतेचे वरदान दे.’ अशी फेसबुक पोस्ट त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :