Video : बिल वाढवल्याचा संशयातून रुग्णाचा डॉक्टरवर चाकूने हल्ला

पुणे: हॉस्पिटलचे बिल वाढवून दिल्याचा संशय आल्याने 75 वर्षीय रुग्णाने डॉक्टवरवरच चाकूने हल्ला केल्याची घटना पुण्यात घडली आहे. सिंहगड रोडवरील नांदेड फाटा येथे असणाऱ्या सिंहगड स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये सोमवारी सायंकाळी हि घटना घडली. रुग्णाने केलेल्या हल्यात डॉक्टरच्या पोटाला आणि हाताला जखम झाली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

सिंहगड स्पेशालिटी रुग्णालयातील डॉ. संतोष आवारी हे दम्याच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णावर उपचार करत होते. रुग्णाची प्रकुर्ती स्थिर होती. मात्र, त्याला आणखी काही दिवस रुग्णालयात ठेवणे गरजेचे होते. दरम्यान डॉ आवारे हे नेहमीप्रमाणे तपासणीसाठी संबंधित रुग्णाजवळ गेले असता त्यांने डॉक्टरवर चाकूने हल्ला केला.

You might also like
Comments
Loading...