निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याने आ.सुरेश धसांनी विरोधी महिला उमेदवाराचे हॉटेल पाडले

Mla suresh Dhas

बीड : भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस सध्या विविध विकासकामा संदर्भात अनेक मंत्री तसेच अधिकाऱ्यांना भेटत आहेत. त्यामुळे त्यांचे राजकीय वजन वाढताना दिसत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी बीड येथे मराठा आरक्षण प्रश्नी मोर्चा काढून सर्वांचे लक्ष वेधले होते. पण आता त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

कारण चार वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत तुमच्यामुळे माझ्या पत्नीचा पराभव झाल्याचा राग मनात धरून आमदार सुरेश धस व सहकाऱ्यांनी आमचे हॉटेल पाडल्याची तक्रार राष्ट्रवादी नेत्याच्या पत्नीने केली आहे. यावरून आमदार धसांसह तीस जणांवर आष्टी पोलिसांत गुन्हा नोंद केला गेला.

मिळालेल्या माहितीनूसार, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आ. सुरेश धस यांच्या पत्नीच्या विरोधात माधुरी मनोज चौधरी यांनी निवडणूक लढवली होती. पण धस यांच्या पत्नीचा त्यात पराभव झाला. त्यानंतर निवडणुकीत उभे असल्याचा राग मनात धरून आमदार सुरेश धस हे पती मनोज चौधरी यांना सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक त्रास देत होते.

दरम्यान, नगर-बीड रोडवरील पांढरी हद्दीत वीस गुंठे जागेत हॉटेल मनोज चौधरी यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. परंतू १९ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास आमदार धस यांनी हॉटेलवर बुलडोझर चालविले. तसेच माधुरी चौधरी आणि मनोज चौधरी यांनाही दमदाटी करत दगडाने मारहाण केली.

त्यामुळे माधुरी चौधरी यांच्या तक्रारीवरून आमदार सुरेश धस यांच्यासह सुधीर पठाडे, रमेश वांढरे, रवींद्र पठाडे, भूषण पठाडे, नितीन पोठरे, विलास भोगाडे, संभाजी भोगाडे, भरत वांढरे, बयाजी वांढरे, पका वांढरे, बंडू देशमुख,संतोष शेळके,रामा शेळके,भरत टाफरे,शिवाजी घुले, अंगद शिंदे, जिया बेग, अय्याज सय्यद, रमेश वांढरे,साधू हंबर्डे, वैभव वांढरे, विठ्ठल भोगाडे, भाऊ पठाडे, प्रकाश वांढरे, नवनाथ भोगाडे, रवी पठाडे, नाना शेळके, सुनील रेडेकर, बाळू रोडे या तीस जणांवर गुन्हा दाखल केला.

महत्त्वाच्या बातम्या